Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सलमान खान : नाही निवडणूक लढवणार, नाही कोणत्याही पक्षासाठी प्रचार करणार

Spread the love

अभिनेता सलमान खानने लोकसभा निवडणूक लढण्याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. सलमानने ट्विटरच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘मी लोकसभा निवडणूक लढवणार अशा बातम्या पसरल्या आहेत मात्र या निव्वळ अफवा आहेत. मी निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याही पक्षासाठी प्रचारही करणार नाही’, असे ट्विट सलमानने आज केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मार्च रोजी ट्विटरवर सलमानला टॅग करून मतदारांना आवाहन करण्याची विनंती केली होती. ते ट्विट आज रीट्विट करत सलमानने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व मतदारांना आवाहन केलं होतं. ‘आपण लोकशाहीत राहतो. येथे मतदानाचा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. हा हक्क आपण सर्वांनी बजावायला हवा, असे मी आवाहन करत आहे’, असे सलमानने या ट्विटमध्ये नमूद केले होते. सलमानने आज सकाळी १० वाजता हे ट्विट केलं आणि त्यानंतर लगेचच सलमान लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार, अशी जोरदार चर्चा सर्वत्र रंगली. त्यामुळे सलमानला घाईघाईने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. दुपारी ३ वाजता सलमानने दुसरे ट्विट करत आपण निवडणूक लढणार नसल्याचे तसेच कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!