Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …Top 20 News Flash

Spread the love

1. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु, उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता, मध्यरात्री उशिरा पर्यंत मोदी शहा यांच्यात खलबते.

2. न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली नेमणूक.

3. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर

4. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवारांची एकत्रित चर्चा, महाराष्ट्रातील स्थितीबाबत आणि जागावाटपावर तासभर चर्चा.

5. अहमदनगर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी करण सनाने यांची नियुक्ती, थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून मान्यता.

6. चौकीदारचे कॅम्पेन फसवं आहे. त्यात अडकू नका – राज ठाकरे

7. उत्तर प्रदेशः मायावती यांनी आयुष्यभर गरिबांच्या आणि महिलांच्या सन्मानासाठी संघर्ष केलाः अखिलेश यादव यांचं मत

8. बसपा अध्यक्ष मायावती यांचे निकटवर्तीय नेताराम यांच्याशी संबंधित दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि नोएडा येथील २० मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

9. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ७ जणांची यादी जाहीर; तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल येथील उमेदवार घोषित

10. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का; दिंडोरीमधून उमेदवारी न मिळाल्याने डॉ. भारती पवारही उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार

11. माढाच्या उमेदवारीसाठी भाजपात दाखल झालेले रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणतात : माझ्यासाठी पद, सत्ता दुय्यम

12. अरुणाचल प्रदेशः भाजपचे ८ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

13. लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने 76 परीक्षा पुढे ढकलल्या

14. गोदिंया लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल. तर २६ जणांनी नेले ५५ अर्ज . 

15. मी राजीनामा दिलेला नाही, राधाकृष्ण विखे-पाटलांचा खुलासा

16. गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सकाळी अपघात, एकाचा मृत्यू.

17. कोईम्बतूरः अपक्ष उमेदवार हातगाडी ओढत गेला उमेदवारी अर्ज भरायला

18. औरंगाबाद: केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत सुपरवायजर पदावर नोकरीचे आमीष दाखवून दोन माजी सैनिकांसह तिघांना ३० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणात आरोपी सुरेंद्र सुभाष काकडे याच्या पोलीस कोठडीत २५ मार्चपर्यंत वाढ

19. औरंगाबाद: मद्यपानाचा जाब विचारताच पत्नीचा जाळून खून करणारा पती राजू रघुनाथ दाभाडे याला जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा

20. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न, पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महत्त्वाची पदं

आपलं सरकार

Click to listen highlighted text!