Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : शिवसेना – भाजपकडून फसवणूक झाल्याने मराठा समाजाचा बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा

Spread the love

भाजप – शिवसेनेने सातत्याने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. दोन्ही पक्षांनी कोणतंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आरक्षणाच्या नावाखाली समाजाची दिशाभूल केलीय. यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मतदान करण्यात येणार नाही, असं मराठा समाजाने म्हटलंय. पुण्यात झालेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या राज्यव्यापी बैठकीत यासंदर्भात ठराव करण्यात आला.  काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना पराभूत करणार आहोत. छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड यांनी मराठा विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे. राज्यात मराठा समाजाची संख्या ५ कोटींवर आहे. त्यामुळे ५ कोटी पत्रके छापून मराठा समाजाच्या प्रत्येक घरात मराठ्यांच्या फसवणुकीची कहाणी मांडणार, अशी माहिती राज्य समन्वयक संजय सावंत, महेश डोंगरे, नानासाहेब जावळे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!