Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा निवडणुकीसाठी चौघांची उमेदवारांची

Spread the love

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत आज राज्यातील तीन मतदारसंघात एकूण 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

7 लोकसभा मतदारसंघात काल पहिल्या टप्प्याची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली. तर आज 10 लोकसभा मतदार संघातील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली. आज 11- भंडारा- गोंदिया मतदारसंघात सुहास अनिल फुंदे (अपक्ष) आणि भीमराव डी. बोरकर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया(डी)) यांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली. 16-नांदेड लोकसभा मतदार संघात पठाण जाफर अली खान एम. खान (इंडियन डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) यांनी आणि 42- सोलापूर मतदार संघात वेंकटेश्वर एम. उर्फ खटकधोंड (हिंदुस्थान जनता पार्टी) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

काल 10- नागपूर लोकसभा मतदार संघात अब्दुल करीन अब्दुल गफ्फार पटेल (अपक्ष) यांनी आणि14- यवतमाळ मतदार संघात सुनील नटराजन नायर (अपक्ष) आणि रमेश जी. पवार (भारतीय बहुजन आघाडी जनता दल (एस.)) यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली,अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!