Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लहान मुलगा , हवा गेलेला फुगा-राज ठाकरे

Spread the love

राज ठाकरेंची स्क्रिप्ट बारामतीहून येते,  राज ठाकरे बारामतीचे पोपट आहेत या मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले कि , मी टीका केली तर हे आम्हाला पोपट म्हणतात, देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा आहे. फुगलेल्या फुग्याला जसा कोणताही आकार दिला जातो तशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची आहे .

मी मनसेच्या वर्धापन दिनी जे काही बोललो ते सगळं युद्ध आणि एअर स्ट्राईक याबाबत होतं. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस काहीही बोलले नाहीत. मात्र तो विषय सोडून ते  सगळं काही बोलले. लहान मुलाला एखादा प्रश्न विचारला जावा आणि त्याने भलतंच काहीतरी उत्तर द्यावं तसं काहीसं देवेंद्र फडणवीस यांचं माझ्याबाबत बोलणं होतं. मी जे प्रश्न विचारले त्यातल्या एकाही प्रश्नाला देवेंद्र फडणवीस उत्तर देऊ शकलेले नाहीत अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

आपल्या भाषणात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मला प्रधानसेवक म्हणा हे मोदींचे वाक्य नाही हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचं वाक्य आहे. ते यांनी कॉपी केलं आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली. आज देश धोक्यात आहे कारण नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही माणसं दुटप्पी आणि खोटारडी आहेत. त्यांच्यावर टीका करणं हेच माझं धोरण आहे असेही  राज ठाकरे म्हणाले.

निवडणूक भारताची आहे की नेपाळची – राज ठाकरे

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “मैं भी चौकीदार हूं” मोहिमेची खिल्ली उडवली. निवडणुका भारताच्या आहेत की, नेपाळच्या असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. इतक्या छोटया विचारांचा पंतप्रधान बघितला नाही. पंतप्रधान म्हणून तुमचे विचार मोठे असले पाहिजेत असे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या “मैं भी चौकीदार हूं” मोहिमेची खिल्ली उडवली.

राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहंवर सडकून टीका केली. ही दोन माणसं देशाच्या राजकीय पटलावरुन बाजूला झाल्याच पाहिजेत. आपल्या विरोधाचा ज्यांना कोणाला फायदा व्हायचा आहे त्यांना तो होऊं दे. तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा. मी गुढीपाडव्याला तुमच्याशी सविस्तर बोलेने असे राज ठाकरे म्हणाले.

…तेव्हा राज ठाकरेंनी अजित पवारांना केला फोन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कधीही जागांची मागणी केली नव्हती असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मनसे सोबत हवी असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाल्यानंतर मी त्यांना फोन केला व त्यांना विचारलं मी तुमच्याकडे जागा मागितल्या का ? किंवा आमच्यापैकी कोणी तुमच्याशी बोललय का? त्यावर त्यांच उत्तर नाही होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा फोन आला. त्यांनी आपल्याल भेटलं पाहिजे असं सांगितलं. त्यावेळी त्यांना सुद्धा याआधी कधी भटलो ? जागा मागितल्या ? हे प्रश्न विचारले. त्यांनी सुद्धा नाही असे उत्तर दिले. मग तुम्ही माझ्याशी न बोलता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना वाटले ती उत्तर कशी देता असा सवाल त्यांना विचारला.

लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाही हे मी आधीच स्पष्ट केलं होतं असं राज ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याआधी मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये सहभागी होणार अशी चर्चा होती. त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हा खुलासा केला. मोदी मुक्त भारतासाठी मात्र सभा घेणार असे त्यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!