Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पवारांच्या दुर्लक्षामुळे दाऊद भारताला मिळू शकला नाही : प्रकाश आंबेडकर

Spread the love

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोट तसेच दंगलीचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता. हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता. मात्र पवार यांनी या प्रस्तावकडे दुर्लक्ष केले, असा सनसनाटी आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून गंभीर आरोप केला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. आंबेडकर यावेळी म्हणाले की,  मी राज्यसभेत खासदार होतो त्यावेळी राम जेठमलानी देखील खासदार होते, आम्ही दोघे मित्र होतो.  त्यांनीच मला ही माहिती पहिल्यांला दिली असे त्यांनी म्हटले आहे.

दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता. हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता. शरद पवार यांनी खुलासा करावा की त्यांनी ही माहिती पंतप्रधान दिली होती का? त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला का? आणि घेतला तर असा निर्णय घेणारे पवार कोण?, असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.

दाऊद स्वत:हून यायला तयार होता. त्याला कोणत्या अटींवर आणता आलं असतं, हे केंद्र सरकार पंतप्रधान यांच्या खात्यातील निर्णय आहे. पवार तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पवारांनी ही माहिती स्वतःकडे ठेवली का? , असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. हा प्रस्ताव दिला हे मला नेटवरुन कळलं. हा प्रस्ताव 1993 ला दिला होता, असेही ते म्हणाले.

इतकं असताना मोदी पवारांच्या घरी का जातात? आता काँग्रेस त्यांच्याबरोबर का आघाडी करते? असा सवाल करत आंबेडकर म्हणाले की, माझी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी होती पण राष्ट्रवादीबाबत मला काही आक्षेप होते. ते मी योग्य वेळी स्पष्ट करीन असं म्हटलं होतं, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.
आता ‘दाऊद द्या’ असं म्हणत पाकिस्तानकडे भीक मागायची वेळ आली आहे. यात खरं काय आहे ते बाहेर आलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!