Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Current News Update : गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांचा शपथ विधी

Spread the love

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर आज रात्री उशिरा राज भवनात भाजपचे आमदार आणि गोवा विधान सभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. आज मी जो काही आहे तो मनोहर पर्रीकरांमुळे आहे. पक्षाने माझ्यावर जी जबादारी दिली आहे ती मी यशस्वीरीत्या पेलेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. दरम्यान काँग्रेने मात्र राज्यपालांवर  पक्षपातीपणाचा आरोप केला असून बोलताना काँग्रेस नेते सुनील कवठणकार म्हणाले कि, गोव्याच्या राज्यपाल भाजपच्या एजंट असल्या सारख्या वागत आहेत. बहुमत आमच्या बाजूने असतानाही आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी न देणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे. आजचा दिवस लोकशाहीच्या दृष्टीने काळा  दिवस असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोबत सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी रविवारी रात्रभर गोवा भाजपची मॅरेथॉन बैठक पार पडली होती. या बैठकीला स्वत: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र सहा तासाच्या या बैठकीनंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला नव्हता. आज सायंकाळी पुन्हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री उशिरा भाजप नेत्यांनी राजभवनमध्ये राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राजभवनातच सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!