Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आता तुम्ही कुठेही असला तरी करू शकता मतदान : निवडणूक अयोग्य

Spread the love

लोकसभा निवडणूक २०१९ अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या सतराव्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यावेळी लोकसभा निवडणुक सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. ११ एप्रिल रोजी मतदानाची सुरूवात होणार असून ११ मे रोजी शेवटचा टप्पा पार पडणार आहे. तसेच २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

यंदा लोकसभा निवडणूकीत जवळजवळ ९० कोटी मतदार मतदान करणार असून १.५० कोटी मतदार हे १८ ते १९ वयोगटातील आहेत. काही मतदार हे नोकरी किंवा शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात स्थायिक झाले आहेत. यामुळे अनेकदा आपल्या मतदारसंघात मतदान करणं त्यांना शक्य होत नाही. पण आता तुम्ही बाहेरगावी असताना तेथील मतदारसंघात मतदान करु शकता. यासाठी तुम्हाला तुमचे नवे मतदानपत्र तयार करुन घेणं गरजेचे आहे.

नव्या ठिकाणी मतदानपत्र मिळवण्यासाठी पुढील गोष्टी करा-

१. www.nvsp.in वर क्लिक करा. तुम्ही जर पहिल्यांदा मतदान करणार असाल किंवा मतदान क्षेत्र बदलणार असाल तर Form 6 वर क्लिक करा. त्यानंतर हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम या तीन भाषांपैकी एक तसेच तुम्हाला सोयीस्कर भाषा निवडा

२. त्यानंतर राज्य किंवा जवळच्या विधानसभा क्षेत्राची माहिती द्या

३. मतदान क्षेत्र बदण्याच्या पर्यायावर क्लिक करा

४. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा

५. यानंतर तुमचा राहता पत्ता आणि कायमचा पत्ता लिहा

६. तसेच ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरही लिहावा

७. त्यानंतर तुमचा फोटो, वय आणि वास्तव्याचा दाखला अपलोड करा

८. डिक्लेअरेशन फॉर्ममध्ये तुमच्या जन्माचा पुरावा द्या. त्यानंतर कोपऱ्यामध्ये दिलेला नंबर पुन्हा टाकून सबमीट या पर्यायावर क्लिक करा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!