Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CSMT Bridge Collapse: स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

Spread the love

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेनेही तत्पूर्वी कारवाई केली होती. पूल दुर्घटनाप्रकरणी संबधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते तर निवृत्त अभियंत्यांची चौकशी केली जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

यापूर्वी, पूल दुर्घटनाप्रकरणी मुख्य अभियंता एस. ओ. कोरी, ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर.बी.तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम ३०४ अ अंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.या याचिकेवर २२ मार्च रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!