Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AIYF : जिल्हा अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड

Spread the love

आॅल इंडिया युथ फेडरेशन ( AIYF) चे औरंगाबाद जिल्हा अधिवेशन कॉम्रेड व्हि डी देशपांडे हॉल येथे उत्साहाच्या पार पडले, विचारमंचावर उदघाटक म्हणून फेडरल बैंकेचे ब्रांच मॅनेजर प्रितम तांदूळजे तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते सीपीआय चे जिल्हा सहसचिव अॅड अभय टाकसाळ,पैरेंट्स असोसिएशन चे जॅक्सन फर्नांडिस उपस्थित होते. प्रास्ताविक विकास गायकवाड यांनी केले. युवकांनी राजकारणातील पोकळी भरून काढून देशाला अभ्यास करुन बोलणारे आणि बोलल्या प्रमाणेच वागणारे नेत्रत्व द्यावे, असे नेत्रत्व तयार करण्याची जबाबदारी ही ए आय वाय एफ ची आहे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार हटवून संविधान वाचविण्यासाठीच्या लढाईत आपल्याला सहभागी व्हावेच लागेल असे आवाहन यावेळी अभय टाकसाळ यांनी केले.

सर्वप्रथम युथ फेडरेशन च्या झेंड्याला सलामी देवुन युथ इंटरनॅशनल गीत सादर करण्यात आले. यावेळी प्रितम तांदूळजे आणि जॅक्सन फर्नाडिस यांचीही भाषणे झाली.
व्दितीय सत्राच्या कामकाजासाठी माधुरी जमधडे, सय्यद अनिस, सुनिल खरात यांचे अध्यक्ष मंडळ निवडण्यात आले. जिल्हाभरातील उपस्थित प्रतिनिधींनी आपले मत मांडले. या सत्रात बेरोजगारी, कर्ज समस्या, वाढत्या आरोग्याच्या समस्या, कामाचे ८ तासच हवे इ. वर ठराव मांडुन त्यासाठी लढा तीव्र करण्याचे नियोजन करण्यात आले.
पदाधिकारी निवडीचे प्रस्ताव मांडण्यात आले व एकमुखाने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

जिल्हा अध्यक्ष :- अँड अय्याज शेख
जिल्हा सचिव :- सुभाष गायकवाड
कोषाध्यक्ष :- सतिष निकम
जिल्हाउपाध्यक्ष :- अनिस सय्यद,
जिल्हासहसचिव :- जब्बार शेख,विकास गायकवाड.
कौन्सिल सदस्य :-
विकास मोरे, सुष्मिता वटाने,माधुरी जमधडे, ज्योतिका गायकवाड, प्रियांका पेढे, रतन गायकवाड, सुनिल खरात, प्रितम घनघावे, आनंद दाने,रेखा निकम, सोहेल शेख
शहराध्यक्ष :- विकास गायकवाड
शहर सचिव :- सुनिल खरात
शहरउपाध्यक्ष:- रतन गायकवाड, जकी सलामी.
शहरसहसचिव:- संदिप पेढे
कौन्सिल :- प्रियांका पेढे,रेखा निकम, माधुरी जमधडे, ज्योतिका गायकवाड,मयूर मस्के, शिवनाथ पवार, संतोष जाधव, मच्छिंद्र गायकवाड,सीमा शेगोकार,सोहेल शेख कोषाध्यक्ष :- प्रितम घनघावे
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ए आय वाय एफ २३ मार्च ला भगतसिंग, सुखदेव राजगुरु यांच्या शहीद दिनानिमित्त जिवंत देखावा उभारनार त्याची तयारी सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!