Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाई, भाई म्हणत ते अंत्ययात्रेत घुसले आणि खिशांवर मारला हात…१३ अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेत ३२ लोकांचे खिसे कापले गेल्याचे गुन्हे पणजी पोलिसात नोंदविण्यात आले आहेत. त्यातील १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे बहुतेक सर्वच खिसेकापू हे गोव्याबाहेरील होते. अंत्ययात्रेला पांढऱ्या वेशात जाण्याची पद्धत आहे. सर्व खिसेकापू पांढरा शर्ट घालूनच आले होते. भाई भाई करीत गर्दीत मिसळले आणि त्याच गर्दीत लोकांच्या खिशातील पाकिटे चोरली. १३ जणांना पाकीटे मारतानाच लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

Advertisements
Advertisements

एका खिसेकापूने तर दोघा जणांची पाकीटे चोरली होती व तिसरे चोरताना तो पकडला गेला. १३ पकडले गेले असले तरी असे कितीतरी निसटलेही असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!