वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएम ला औरंगाबादसह दोन जागा , न्या . कोळसे पाटील यांचा प्रश्न निकालात

Advertisements
Spread the love

अखेर बहुचर्चित औरंगाबादसह लोकसभेच्या दोन जागा वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला सोडल्या असून या दोन्हीही जागेवर एमआयएमने उमेदवार द्यावेत असे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी घोषित केले असल्याने न्या.कोळसेपाटील यांचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने निकालात निघाला आहे. आता न्या.कोळसे पाटील जनता दलाच्या तिकिटावर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लढणारका? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेस आघाडीशी युती होत नाही हे लक्षात आल्यानंतर एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे औरंगाबादसह दोन जागांची मागणी केली असल्याचे सर्वात पहिले वृत्त “महानायक ऑनलाईन”ने दिले होते। एम आयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी ” महानायक ऑनलाईन”  शी  बोलताना आपण हि मागणी पक्षाचे प्रमुख खा। अशींदोद्दीन ओवैसी यांच्याकडे करणार असल्याचे म्हटले होते। त्यामुळे या जागेवरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता कारण औरंगाबंदची जागा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी परभणीच्या सभेत न्या।कोळसेपाटील यांच्या नावाने घोषित केली होती.

या घोषणे नंतर वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेस आघाडीशी युती होते कि नाही याची प्रतीक्षा एम आय एम ने केली परंतु तसे होताना दिसत नसल्याचे चित्र समोर येताच एम आय एम च्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी हि जागा आम्हाला देण्यात यावी असा आग्रह धरला आमचे २५ नगरसेवक ज्या शहरात आहेत त्या शहरात आम्ही लढायचे नाही तर कुठे लढायचे ? असा या कार्यकर्त्यांचा सवाल होता त्यानुसार आमदार इम्तियाज जलील यांनी हैदराबादेत जाऊन खा. ओवैसी यांची भेट घेऊन औरंगाबादसह आपल्या पक्षाला दोन जागा देण्यात याव्यात अशी मागणी केली.

दरम्यान औरंगाबादची जागा न्या. कोळसे पाटील यांना केली असल्याने वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती परंतु सदर प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय सावध पवित्रा घेत न्या.कोळसेपाटील हे वंचित आघाडीचे  उमेदवारनसून ते देवेगौडा यांच्या जनता दलाचे उमेदवार असल्याचे सांगून औरंगाबादच्या जागेचा वाद देवेगौडा आणि ओवैसी यांनी सोडवावा असे म्हटले होते परंतु आज त्यांनी ए आय एन शी बोलताना सांगितले , कि या बाबत त्यांची ओवैसी यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी औरंगाबादची एक आणि मुंबईची एक अशा दोन जागी आपले उमेदवार द्यावेत  असे सांगून त्यांनी या वादावर पडदा टाकला.  त्यामुळे आपोआपच वंचित बहुजन आघाडीकडून न्या . कोळसे पाटील यांच्या नावाचा विषय संपला आहे . आता या जागेवर एम आय एम कोणाला लढवणार ? हा त्यांचा प्रश्न आहे . दरम्यान औरंगाबादेतून एम आय एम च्या वतीने आमदार इम्तियाज जलील यांनी लढण्याची तयारी केली आहे .