प्रा . जोगेंद्र कवाडे यांची भाजप , संघ आणि वंचित बहुजन आघाडीवर गंभीर टीका

Advertisements
Spread the love

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या जाती जाहीर करणं म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या जाती अंत विचारला गालबोट लावण्याचा प्रकार आहे, असं कवाडे म्हणाले.  प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी अहमदनगरमध्ये पत्रका परिषद घेत वंचित बहुजन आघाडीसह भाजपवर टीका केली.

देशात भाजपचे नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची दोन समांतर सरकारे कार्यरत असल्याचा आरोप कवाडेंनी केला. पीपल्स रिपब्लिकन पक्षाने शिर्डीसह रामटेक(नागपूर), अमरावती आणि इचलकरंजी अशा ४ जागा दोन्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे मागितल्या आहेत. यापैकी किमान २ तरी जागा मिळतील, अशी अपेक्षा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. प्रा. जोगेंद्र कवाडे यांची वंचित बहुजन आघाडी नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर टीका केली आहे.