Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बोलले खोतकर कि , दगा फटका करणार नाही , उद्वव ठाकरेंचा आदेश माझ्यासाठी अंतिम

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्यासाठी हॉटेल रामाच्या रूम नंबर ३२५ येथे बैठक झाली. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा जालना लोकसभा मतदार संघाचे रावसाहेब दानवे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, संजय राऊत, खासदार प्रीतम मुंडे, मिलींद नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीआधीच खोतकर यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती. मुख्यमंत्री येण्याअगोदर ठाकरे व खोतकर यांच्यात चर्चा झाली. तेव्हा खोतकरांनी त्यांच्याविरोधात दानवे यांनी केलेल्या षडयंत्राचा पाडा वाचला.

अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये अखेर दिलजमाई झाली आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत जालना येथील तिडा सुटला आहे. खोतकर यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जालना मतदार संघातून रावसाहेब दानवे युतीचे उमेदवार असतील.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, मी कडवट शिवसैनिक आहे दगाफटका करणार नाही. उद्वव ठाकरेंचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल. जी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडेल. औरंगाबादमध्ये आज शिवसेना-भाजपाचा संयुक्त मेळावा सुरू झाला आहे. आजपासून युतीच्या कामाला लागणार आहे. रावसाहेब तुम्ही राज्यभर फिरा, मी आणि पंकजा मुंडे दोघे तुमच्यासाठी जालना मतदारसंघात प्रचार करू असेही खोतकर यावेळी म्हणाले. जालन्यात युतीचा भगवा फडकवू असे म्हणत खोतकर यांनी युतीचे काम करण्याची घोषणा केली.

यावेळी वाद मिटला का असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की माझ्या चेहर्‍यावर आनंद दिसत नाही का, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण घोषणा श्रीहरी पव्हेलीयन येथील युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!