Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : आज भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता … आणि इतर बातम्या …

Spread the love

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर आज जाहीर होण्याची शक्यता असून यात नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या जागा घोषित करण्यात येतील.

येत्या ११  एप्रिलला लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात ९१  जागांवर निवडणूक होणार असल्याने  आज  संध्याकाळी साडे चार वाजता  भाजपाच्या केंद्रीय निवडणूक आयोग समितीची बैठक होणार असून या बैठकीत नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत . या बैठकीनंतर भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या १००  उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाच्या या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, सदानंद गौडा, राधामोहन सिंह यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, असे सांगण्यात येत आहे.

1. वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची  पहिली यादी जाहीर: प्रकाश आंबेडकर

 2. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर; दिंडोरीतून धनराज महाले, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे, बीडमधून बजरंग सोनावणे  , समीर भुजबळ नाशिक मतदारसंघातून तर मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर

3. खासदार भावना गवळी यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची शिवसेनेची उमेदवारी घोषित; उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरावती येथे घोषणा

4. पराभवाचा अंदाज आल्यानेच शरद पवारांची माघार-नितीन गडकरी

5. सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारीची ऑफर दिली होती, सुजय विखेंनी राष्ट्रवादीची ऑफर धुडकावली :  अजित पवार

6. पूल अपघातः दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन

7. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातास जबाबदार असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात दोन निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांवरील कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

8. लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून तिसरी यादी जाहीर

9. काँग्रेस ने आपली तिसरी यादी नुकतीच घोषित केली असून त्यात १८ जागांचा समावेश आहे. यात ५अ आसाम ,८ तेलंगाणा, २ मेघालय आणि उत्तर प्रदेश , नागालँड व सिक्कीम येथील प्रत्येकी एका जगाचा समावेश आहे. यामध्ये सुश्मितादेव, जी. गोगई, मुकुल संगमा आणि तनुज पुनिया यांच्या जागा आहेत.

10. औरंगाबाद : विजेचा धक्का लागून दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू, खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथील घटना

11. पिंपरी- वीटभट्टी कामगाराला खायला लावली विष्ठा; मालकाविरोधात गुन्हा दाखल

12. मुंबई: जे.जे. पुलाखाली भायखळाच्या दिशेने वाहतूक कोंडी

13. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात दोन कारमध्ये ८० लाखांची बेनामी रोकड जप्त, मध्य प्रदेशातून रोकड आणल्याची चर्चा

14. मुलीशी लज्जास्पद कृत्य करुन जिवे मारण्याच्या धमक्या देणारा आरोपी राहूल श्रीकांत सोनवणे याला औरंगाबाद न्यायालयात एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडांची शिक्षा

15. रिपाइं नेते रामदास आठवले यांनी सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेच्या घटनास्थळाची पाहणी केली.

16. नागपूरातील  शिवसेना-भाजप युती मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित.

17. स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात बैठक, सांगलीच्या मतदारसंघाबाबत शनिवारी अंतिम निर्णय.

18. औरंगाबाद: अंतापूर येथे उसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे सापडले. बछडे वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात.

19. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शशिकांत कर्णिक यांचे काल रात्री शारजा येथे दुःखद निधन

20. राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सचिन आहिर यांनी जीटी रुग्णालयाला भेट देऊन केली जखमींची विचारपूस

21. रामदास आठवले यांना लोकसभा जागा आणि रिपब्लिकन कार्यकएत्यांना महामंडळ पदे न दिल्याने रिपब्लिकन मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे आणि कामगार आघाडी अध्यक्ष महेश शिंदे यांचे पक्षाचे राजीनामे; भाजपचे उमेदवारांना शह देण्याचा प्रयत्न.

22. नाना पटोले समर्थकांची नागपूर रेल्वे स्टेशनवर मोठया प्रमाणात गर्दी; नाना पटोले यांचे उत्स्फूर्त स्वागत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!