Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : राज्यात १८-१९ वयोगटातील १२ लाख मतदार

Spread the love

राज्यातील  ११ लाख ९९ हजार ५२७ तरूण मतदार  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्कबजावणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहितीपुढे आली आहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात  मतदारांची  एकूणसंख्या ८ कोटी ७३ लाख २९ हजार९१० आहे. राज्यात १८ ते १९ वर्षवयोगटात अर्थात प्रथमच मतदारम्हणून नोंदणी करणाऱ्या तरूणांची संख्या ११ लाख ९९ हजार ५२७ आहे. हे तरुण प्रथमच लोकसभानिवडणुकीसाठी मतदानाचा हक्कबजावणार आहेत.देशात १८ ते १९ वर्ष वयोगटातीलमतदारांची एकूण संख्या १ कोटी ५० लाख ६४ हजार ८२४ आहे.

कोटी  १६ लाख महिलामतदार

मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत.राज्यातील पुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागे नोंदणीकृत ९११ महिला मतदारअसे आहे. राज्यातएकूण ८ कोटी ७३ लाख २९ हजार ९१० नोंदणीकृत मतदार आहेत.यापैकी  ४ कोटी ५७ लाख १ हजार ८७७ पुरुष तर  ४ कोटी १६ लाख २५ हजार ९५० महिला मतदार आहेत.राज्यात २ हजार ८३ नोंदणीकृत तृतीयपंथी मतदार आहेत.

एक हजार लोकसंख्येमागे मतदारनोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे. राज्यात एक हजार लोकसंख्येमागे ७१० नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यात एकूण४८ लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात  एकूण ९५ हजार४७५ मतदान केंद्रावर मतदानघेण्यात येणार आहे.

देशात ८९ कोटी ८७ लाखमतदार

देशातील २९ राज्यआणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजमितीस एकूण ८९ कोटी ८७ लाख ६८ हजार ९७८ मतदार आहेत.यामध्ये ४६ कोटी ७० लाख ४ हजार ८६१  पुरुष मतदार आहेत तर४३ कोटी १६ लाख ८९ हजार ७२५ महिला मतदार आहेत.देशभरात ३१ हजार २९२  तृतीयपंथी मतदार आहेत.

                                   

आपलं सरकार

Click to listen highlighted text!