Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खळबळ जनक : देशाची ही शेवटची निवडणूक, यापुढे निवडणुकाच होणार नाहीत : खा. साक्षी महाराज

Spread the love

आपण साधू संन्याशी असून देशसेवेसाठी व्यतिरिक्त आपल्या मनात काहीच नाही. देशाची ही शेवटची सार्वत्रिक निवडणूक असून २०१९ नंतर  पुन्हा देशात निवडणुकाच होणार नाहीत, असे  वक्तव्य खुद्द भाजपचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी केले असल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे.

खा. साक्षी महाराज यांनी उन्नावच्या भाजप कार्यकर्त्यांसमोर पुढे म्हटले आहे की, मोदी नावाची त्सुनामी आली आहे. देशात जागृती आली आहे. मोदी म्हणजेच देश आहेत. मला वाटते की, या निवडणुकीनंतर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत. फक्त हीच देशाची अखेरची निवडणूक आहे. त्यामुळे देशासाठी तुम्ही नेतृत्व निवडू शकता’, असे धक्कादायक वक्तव्य साक्षी महाराज यांनी केले आहे.

दरम्यान, साक्षी महाराज यांच्या आधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिंकून आल्यास देशातील सार्वत्रिक निवडणुका बंद करेल असा आरोप केला होता. अशोक गेहलोत म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष ही लोकसभा निवडणुका जिंकल्यास देशात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होण्याची शाश्वती नाही’.

गहलोत यांच्या मतांवर जणू खा. साक्षी महाराज यांनी शिक्का मोर्तब केले आहे. त्यांच्या या ह्यावरुन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खा. साक्षी महाराज भाजपचे महत्वाचे खासदार आहेत. आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळाले नाही तर मोठे परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!