Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी पुन्हा सत्तेत आल्यास सार्वत्रिक निवडणुका होण्याची शाश्वती नाही : अशोक गेहलोत

Spread the love

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष देशात पुन्हा  सत्तेत आल्यास सार्वत्रिक निवडणुका होण्याची शाश्वती नाही’,  आपण अत्यंत गांभीर्याने बोलत आहोत असे   वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले  आहे.  मोदी, त्यांचा पक्ष तसेच त्यांची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लोकशाहीवर विश्वास नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले असून त्या आधारावरच मी हे विधान करत असल्याचेही गेहलोत म्हणाले. राजस्थानमधील श्रीडुंगरगड येथे आयोजित जाहीर सभेत गेहलोत बोलत होते.
भाजप आणि आरएसएसला त्यांच्या विरोधात कुणी बोलल्यास ते सहन होत नाही. लोकशाहीत विरोधी पक्षाचा आणि विरोधी मताचा आदर व्हावा, असे गांधीजींनी सांगितले होते मात्र, पंतप्रधान मोदी, वसुंधरा राजे यांसारखे नेते व आरएसएसला ते मान्य नाही. या कुणाचाच लोकशाहीवर विश्वास नाही, अशी टीका गेहलोत यांनी केली. गेल्या ७० वर्षांपासून काँग्रेसने लोकशाही जपली आहे आणि भारतात लोकशाही नसती तर मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असा टोलाही गेहलोत यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!