Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सीएसटीएम पूल  दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे सखोल चौकशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisements
Advertisements
Spread the love

सीएसटीएम येथील पूल  दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले . ते पुढे म्हणाले कि , आपण या घटनेच्या मुळापर्यंत जाणार असून या पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं अशी माहिती आहे . त्यात काही किरकोळ दुरुस्त्यांच्या सूचना करण्यात आल्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले .  सीएसटीएम येथील पूल दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी जाहीर केलं. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं . सीएसटीएम येथे हिमालया पूल कोसळून ५ लोक ठार झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत तसेच उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisements

सुभाष देसाई : विनोद तावडे
या पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं. हा पूल १०० टक्के धोकादायक नव्हता. मात्र या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. तर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.
पंतप्रधानांचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून या दुर्घटनेत प्राण गमवावे लागलेल्यांबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसेच दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र सरकार दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करतील, असंही सांगितलं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही सीएसटीएम दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!