Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Atrocity : वीटभट्टीवरील मजुराला बेदम मारहाण , मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले : मालक अटकेत

Spread the love

कामाला का लागत नाही असे विचारत , विटभट्टीच्या मालकाने मजुराला बेदम मारहाण करत मानवी विष्ठा खाण्यास भाग पडल्याची संतापजनक घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. या घटनेच्या विरुद्ध आरोपी मालक संदीप पवार याच्याविरोधात पीडित २२ वर्षीय मजुराने फिर्याद दिली असून या प्रकरणी हिंजवडी पोलिसात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मालक संदीप पवार याला तत्काळ अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय मजूर हा आई, वडील, आजोबा आणि आजीसोबत हिंजवडी जवळील जांबे येथील आरोपी संदीप पवार याच्या विटभट्टीवर काम करतात. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मजूर आणि त्याचे कुटुंब हे जेवण करून बसले होते. काही वेळाने आरोपी मालक संदीप पवार आला आणि त्याने काम करायला सुरू करा असे सांगितले. यावर मजुराने आत्ताच जेवण केलं आहे थोडं बसतो असे सांगितले असता मालकाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर मजुराने देखील शिवीगाळ केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपी संदीप पवार याने त्याच्या पत्नीला घमेल्यात मानवी विष्ठा आणण्यास सांगितली. विष्ठा घेऊन आल्यानंतर मजुराला बेदम मारहाण करत विष्ठा खाण्यास संदीप पवार याने भाग पाडले.  या संतापजक घटने प्रकरणी पीडित मजुराने हिंजवडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!