वंचित बहुजन आघाडीशी युती बाबत अखेरपर्यंत प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू : अशोक चव्हाण

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरी काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत युती करण्याबाबत आपले दरवाजे बंद असल्याचे म्हटले असले तरी त्यांच्यासोबत  युतीच्या चर्चेसाठी आपण शेवटपर्यंत आशावादी असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.  गांधीभवन येथील लोकसभा निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीपूर्वी ते बोलत होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी नगरसह विविध मुद्यांवर आपली मते मंडळी  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले कि , सुजयच्या जाण्याने आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नसून राधाकृष्ण विखे पाटील यांना राजीनामा मागण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे   सांगताना हेसुद्धा स्पष्ट केले कि त्यांना कुणीही राजीनामा मागितला नाही.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये अंसतोष आहे. त्यामुळे विखे पाटलांना विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा मागितला जाणार का, असे त्यांना विचारण्यात आले होते .  नगरच्या जागे बाबत बोलताना ते म्हणाले कि , नगरची जागा आम्हाला मिळावि अशी आमची आमची मागणी होती. ती पूर्ण होऊ शकली नाही.  परंतु त्याचा आघाडीवर परिणाम होणार नाही .  अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात आपले मत मांडले. प्रकाश आंबेडकरांनी युतीच्या चर्चेसाठी दरवाजे बंद झाल्याचे म्हटले आहे. तरी देखील आम्ही शेवटपर्यंत युतीच्या चर्चेसाठी तयार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी नागपूर मतदार संघातील नाना पटोले यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचाच विजय होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *