Live News Updates : ‘सीएसएमटी’ पुल दुर्घटना : मृतांच्या संख्येत वाढ

Advertisements
Spread the love

https://youtu.be/BRJbpFrR3uI

अधिक माहितीसाठी संपर्क साधा, सेंट जॉर्ज हॉस्पिटल हेल्पलाइन क्रमांक- २२६२०२४२

जखमींची नावे :

सोनाली नवले, अद्वित नवले, राजेंद्र नवले, राजेश लोखंडे, तुकाराम एडगे, जयेश अवलानी, मोहन कायगुडे, महेश शेरे, अजय पंडित, हर्षदा वाघरे, विजय भागवत, निलेश पाटवकर,परशुराम पवार, मुन्नीलाल जैसवाल, मोहन मोजदा, आयुषी रांका, राम कुकरेजा, रवी शेट्टी, राजदास, सुनिल गिरलोटकर,अनिकेत अनिल जाधव,अभिजीत माना, राजकुमार चावला, शुभेश बॅनर्जी,रवी ,नंदा विठ्ठल कदम, राकेश मिश्रा, अत्तार खान, सुजय माजी, कन्नुभाई सोलंकी, दिपक पारेख,राहीद

दुर्घटनाग्रस्त पुलाखालून डेब्रिज हटविण्यात आले; बंद केलेली वाहतूक थोडयाच वेळात सुरळीत होईल – मुंबई पोलीस

पुढील सूचना मिळेपर्यंत जेजे फ्लायओव्हर वाहतुकीस बंदी : वाहतूक वळवली

वाहतूक व्यवस्थेत बदल, महानगरपालिका रोडकडे जाणारी वाहतूक मेट्रो जंक्शनकडे वळवण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी वाहतूक रोखली

मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी – नरेंद्र मोदी : अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी असल्याचं मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून दुःख व्यक्त

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत तर जखमींना ५० हजारांची मदत आणि उपचाराचा खर्च सरकार करणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

एम आय एम चे आमदार वारीस पठाण घटनास्थळी तात्काळ दाखल. स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये, पण पुलासाठी पैसे नाहीत : आमदार वारिस पठाण

खा . अनंतराव देशमुख यांचीही घटना स्थळाला भेट.

मोदी आणि महाराष्ट्र सरकार दोषी, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देण्याची काँग्रेसचे  मुरली देवरा यांची मागणी

पुलाचे ऑडिट झाले नव्हते, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार, स्थानिक नगरसेविकेचा आरोप

पुल धोकादायक नव्हता, किरकोळ दुरुस्ती सुरू होती, विनोद तावडे यांची माहिती

कोसळलेला पुलाचा मलबा दूर करून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात

पुल दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन महिला जीटी रुग्णालायतील नर्स असल्याची माहिती

दुर्घटनेतील जखमींना सेंट जॉर्ज आणि जी.टी. रुग्णालयात  दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

राज्य सरकारने नाही, महापालिकेने केले होते पुलाचे ऑडिट-राज पुरोहित

कोसळलेला पूल मुंबई महापालिकेचा; रेल्वे मंत्रालयाने जबाबदारी झटकली

एलफिन्स्टन पूल दुर्घटना झाल्यानंतर मुंबईतील सगळ्या पुलांचे ऑडिट का केले गेले नाही?  भावनिक राजकारण करत बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, पुलाचे ऑडिट झाले असते तर लोकांचा नाहक बळी गेला नसता या मृत्यूंना कोण जबाबदार आहे  असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयावर आणि महापालिका प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे. ही घटना दुर्दैवी आहे आणि मनसे अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सामील आहे. रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले,  याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील, मनसेने सनदशीर मार्गाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला, पण सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.