Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bheema Koregao : अटक करण्यात आलेल्यांचा सरकार उलथून टाकण्याचा डाव होता : पुणे पोलिसांचे शपथपत्र

Spread the love

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकार उलथवून लावण्याचा डाव होता. सीपीआय (माओवादी)चे हे मनसुबे पूर्ण करण्यासाठी दलित तरुणांना तयारही केले  जात होते , असे  पुणे पोलिसांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा दावा केला आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी फरेरासह आठ जणांना अटक केली होती. फरेरा आणि वर्नोन गोन्साल्वीस यांचा जामीन अर्ज न्यायाधीश पी.ए. देशमुख यांच्यासमोर आला असून त्यावर ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. वर्नोन गोन्साल्वीस यांच्या याचिकेवर अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं नाही. दरम्यान, फरेरा आणि अन्य आरोपी सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. हे आरोपी सीपीआयला बेकायदेशीररित्या मदत करत होते. त्यांचा प्रचारही करत होते. राजकीय सत्ता हस्तगत करणं माओवाद्यांचं ध्येय आहे. त्यासाठी माओवाद्यांची तयारी सुरू होती आणि पारंपारिक लढाईनेच नव्हे तर जनयुद्ध घडवून आणण्याचाही त्यांचा प्रयत्न होता, असं चौकशीतून पुढे आले  आहे.

दलितांमध्ये सीपीआय (माओवादी)चे  जाळे  पसरविण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी दलितांमध्ये आत्मसन्मान जागृत करून त्यांना उच्चवर्णीय आणि उच्च जातींविरोधात लढण्यासाठी तयार केले  जात होते , असेही पोलिसांनी या प्रतिज्ञापत्रात नमूद केले  आहे. सीपीआयने काही दलित संघटनांना एकत्र आणले  असून त्यांना आर्थिक रसदही पुरविली आहे. हिंसेद्वारे अराजकता निर्माण करणे , द्वेष पसरवणे , भडकावणे  आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेले  सरकार पाडण्याचा फरेरा आणि अन्य लोकांचा डाव होता, असे  या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!