१८-१९ : एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात नवमतदार ४५ हजाराच्या घरात

Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात २०००- २००१ साली जन्माला आलेल्या मतदारांची संख्या ४५ हजार ५७५ असून हे सर्व नवीन नवमतदार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. फुलंब्री, सिल्लोड, पैठण हे   तीन विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यात आहेत. अंदाजे १३ हजार नवमतदार या तीन तालुक्यांत असतील. उर्वरित ३२ हजार नवमतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत. कन्नड, औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मध्य आणि वैजापूर, गंगापूर हे विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २००९ सालीदेखील २३ एप्रिल रोजीच मतदान झाले होते. या निवडणुकीत १८ ते ३० दरम्यान वयोगटातील तरुण मतदारांचे प्रमाण २३ टक्के आहे. मतदान निर्णायक असणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६ लाख १२ हजार १५३ मतदार २० ते २९ या वयोगटातील असून, १८ ते १९ या वयोगटातील ४५ हजार ५७५ मतदार आहेत. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीमध्ये सदरील माहिती नमूद करण्यात आली आहे. या नवमतदारांचा कल कुणाकडे असेल यावरही या दोन्हीही मतदार संघातील उमदेवारांचे भवितव्य  अवलंबून असणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी एकूण ६५ लाख मतदार वाढले आहेत.