Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मायावतींच्या युतीला नकार असेल तर आम्हालाही गरज नाही : काँग्रेस

Spread the love

लोकसभा निवडणुकीत बसपा अध्यक्ष मायावतींनी युती करण्यास स्पष्टपणे दिलेला नकार काँग्रेसला झोंबला आहे. आम्हालाही मायावतींची गरज नाही, असं खरमरीत उत्तर काँग्रेसकडून देण्यात आलंय. काँग्रेसला बसपासोबत युती हवी की नाही? हे मायवतींनी ठरवू नये. मायावतींकडे एकतरी खासदार आहे का? मग काँग्रेसने त्यांच्याकडे युतीची मागणी करण्यासाठी यावं हे मायावती कशा काय ठरवू शकतात. आम्ही स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवू. आम्हाला मायावतींची गरज नाही, असं प्रत्युत्तर उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे प्रवक्ते राजीव बक्षी यांनी दिलंय.

मायावतींनी काँग्रेसकडे बघण्यापेक्षा समाजवादी पक्षासोबत झालेल्या युतीकडे लक्ष द्यावं. पुढच्या १५ ते २० दिवसांत काय घडतंय ते बघा. बसपाशी युती करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये कुठल्याही पातळीवर चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळेच काँग्रेससोबत युती करण्यासाठी धडपडत असलेल्या बसपाची ही अस्वस्थता समोर आली आहे, असं बक्षी म्हणाले. मायावतींच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आम्ही उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवतोय. पण बसपा आणि सपा यांच्या युतीचा मार्ग आणि आमचा मार्ग वेगवेगळा असला तरी भाजपला पराभूत करणं हाच आमचा उद्देश आहे, असं पश्चिम उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!