Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : दिवसभरातील चर्चेतल्या बातम्या …

Spread the love

>> नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्याविरोधात मी लढणार, माझी बांधिलकी बहुजन समाजाबरोबर – भीम आर्मी चीफ चंद्रशेखर : प्रियांका गांधी यांनी घेतली चंद्रशेखर आझाद यांची भेट.

1. नवी दिल्ली: राफेल प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सुप्रीम कोर्टाची संरक्षण मंत्रालयाला परवानगी.

2. विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत आपला फोटो पोस्ट करणारे भाजप आमदार ओ. पी. शर्मा यांना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक घोषणेपूर्वीच फोटो पोस्ट केल्याचे शर्मा यांचे स्पष्टीकरण.

3. कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि कथित माओवादी संबंध प्रकरण: अरुण फरेरा आणि वेर्नन गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्ट घेणार ५ एप्रिलला सुनावणी.

4. पंढरपूर: संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणूक लढवणार; सोलापूर, पुणे, माढा, अहमदनगर, बुलडाणा आणि औरंगाबादसह लढवणार १८ जागा.

5. माझ्या राजीनाम्याची माध्यमांना घाई लागली आहे : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे , उद्या जाहीर करणार राजकीय भूमिका.

6. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांची घेतली भेट; चंद्रशेखर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

7. औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार १५ मार्चपासून सुरू करणार- जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांची घोषणा.

8. औरंगाबाद महापालिकेत पाच नगरसेवक असलेल्या बहुजन समाज पार्टीकडून औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू

9. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी औरंगाबादेत शिवसेना – भाजप युतीतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचा मेळावा

10. औरंगाबाद: भाजप वॉर्ड अध्यक्ष सुनिल प्रल्हाद अहिरे यांच्या आत्महत्याप्रकरणात छाया मनोहर लोखंडे व जिजाबाई बाबुराव गव्हाले या आरोपींना बुधवारी अटक व शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

11. अहमदनगरः नगर शहरातील भिंगारमधील प्रदीप रामसिंग टाक याच्या खूनप्रकरणात सिध्दार्थ धर्माजी उबाळे, सुमीत धर्माजी उबाळे या दोघा सख्या भावांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

आपलं सरकार

Click to listen highlighted text!