Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपला बहुमत मिळणार नाही म्हणून मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनणार नाहीत : शरद पवार

Spread the love

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी कधी ना कधी निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मी कधीच पराभूत झालो नाही. त्यामुळे पराभवाच्या भीतीने मी माघार घेतली हे भाजपचं म्हणणं बालिशपणाचं आहे, असं सांगतानाच मला राजकारणात पन्नास वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडण्याचा विचार करायला हवा म्हणून मी निवडणुकीतून माघार घेतली, अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे एका पुरस्कार वितरण समारंभात बोलताना  केली . ते पुढे म्हणाले कि ,  सध्या वातावरण काही असलं तरी निवडणुकीनंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे भाजपला आघाडी करावी लागेल. त्यावेळी आघाडीतील लोक मोदींना स्वीकारणार नाहीत. त्यामुळे मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आमच्या कोट्यातून एक जागा सोडण्यात आली आहे, असं सांगतानाच प्रकाश आंबेडकर कधीच आमच्याबरोबर नव्हते. त्यामुळे काहीही गळ्यात मारू नका, असं त्यांनी सांगितलं.

आपल्या मुलाचा हट्ट ज्यानं त्यानं पुरवावा…

आपल्या मुलाचा हट्ट ज्यानं त्यानं पुरवावा. इतर पक्षांची ती जबाबदारी नाही. माझ्या घरातील मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, त्यांना काय वाटेल, अशी खोचक टीका राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.   ही खोचक टीका केली. सुजय विखे-पाटील एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो. तो खासदारकीसाठी एखाद्या जागेचा हट्ट करतो. त्याचा हा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची आहे. त्यांच्या वडिलांची आहे, असा टोला शरद पवार यांनी हाणला. तर, रस्ता बदलल्याने कोणाला काही मिळत असेल तर त्यांनी खुशाल घ्यावं, असा सल्ला त्यांनी भाजपच्या वाटेवर असलेल्यांना दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!