पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून गुप्तांग कापून केला गुंडाचा खून , दोघांना अटक

Advertisements
Spread the love

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मुंबईतील एका सराईत गुंडाचं गुप्तांग कापून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनिल शेलार (वय ३६) असं मृताचं नाव आहे. मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार असलेल्या मित्राच्या पत्नीशी शेलारचे अनैतिक संबंध होते. यातूनच त्याची हत्या करण्यात आली.

एका फसवणूक प्रकरणात त्याच्या मित्राला अटक झाली होती. जानेवारीतच तो तुरुंगातून बाहेर आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.  शेलारचा मृतदेह सापडल्यानंतर दयाराम सोळंकी उर्फ महेंद्र (वय ३५) हा फरार झाला होता. त्यामुळं संशय बळावला. पत्नीपासून दूर राहा, असे सोळंकीनं शेलारला अनेकदा बजावले होते . तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती.  सोळंकीनं गोलू वाघेला उर्फ गणेश याच्यासोबत कट रचून शेलारला बोलावून घेतलं होतं. त्यानुसार शेलार घटनास्थळी आला. तिथे त्यांच्यात बाचाबाची झाली. सोळंकीनं शेलारच्या डोक्यात सळईनं प्रहार केला. त्यामुळे शेलार जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्यानं गुप्तांग कापले, अनिल शेलार विद्युत विभागाच्या केबिनजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर खोल जखमा झाल्या होत्या अशी माहितीही  पोलिसांनी दिली.