Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपचे नाराज मित्र पक्ष वाऱ्यावर , महादेव जाणकारांची मोठी कोंडी : राजू शेट्टी सुद्धा अधांतरी !!

Spread the love

शिवसेना-भाजपा युतीच्या निर्णयानुसार शिवसेनेने २३ जागा आणि भारतीय जनता पार्टीने २५ जागा लढवणार असल्याची घोषणाही शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी केली असली तरी या दोन्हीही नेत्यांनी आपल्या मित्र पक्षांना अद्याप विश्वासात न घेतल्याने नाराजांनी एकत्रित बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने जोरदार हालचाली सुरुकरीत दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे परंतु त्यांच्या कुठल्याही दबावाची  दखल भाजप-सेनेचे नेते घेत नसल्याने नाराज नेते चिंताग्रस्त झाले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान रामदास आठवले आणि सदाभाऊ खोत यांनी मात्र आपण भाजप सोबतच राहू असा पवित्रा घेतला असल्याने महादेव जानकर आणि विनायक मेटे एकटे पडले आहेत.

शिवसेना-भाजपने  जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्याव  अन्यथा आम्हाला चौथी आघाडी करावी लागेल असा इशारा काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी दिला होता. सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटनादेखील आपल्यासोबत असल्याचा दावा महादेव जानकर यांनी केला मात्र आम्ही चौथ्या आघाडीत जाणार नाही, मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले आहे .
सदाभाऊ खोत म्हणाले की, चौथ्या आघाडीत सामील होण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत भाजपसोबतच राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हातकंणगले मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. मात्र ही जागा शिवसेनेच्या कोट्यातील आहे. शिवसेना हातकंणगले मतदारसंघ सोडण्यास तयार नाही मात्र आम्ही प्रयत्न करत आहोत. अद्याप शिवसेना नेत्यांशी बोलणं झाले नसलं तरी मुख्यमंत्री या जागेबाबत निर्णय घेतील.

दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीला ३ जागा द्या अन्यथा १५ जागांवर उमेदवार उभे करुन स्वबळावर आगामी लोकसभा निवडणूक लढवू असा इशारा दिला. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी १३  मार्चपर्यंत निर्णय घ्या असा अल्टीमेटम दिला होता. मात्र अद्याप आघाडीकडून कोणताही प्रस्ताव अथवा चर्चा राजू शेट्टी यांच्याशी करण्यात आली नाही अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत हा निर्णय न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील १५ जागांवरील लोकसभा उमेदवारांची घोषणा करु शकते.

दरम्यान महादेव जानकर यांनी मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जानकर यांनी प्रचंड प्रमाण मते मिळवली, धनगर समाजाला आरक्षण देऊ या आश्वासनामुळे भाजपला त्यावेळी निवडणुकीत फायदा झाला होता मात्र आता ही परिस्थिती नाही. त्यामुळे महादेव जानकर यांना तिकीट देण्याबाबत भाजपमध्ये एकमत नाही, त्यामुळे जानकर यांनी मंगळवारी पुण्यात राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

हातकंणगले, कोल्हापूर, सांगली, बुलडाणा, वर्धा, औरंगाबाद, लातूर, परभणी, शिर्डी, नाशिक, माढा, धुळे, नंदूरबार, शिरुर  या जागा स्वाभिमानी पक्ष लढविणार आहे . शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी बॅट हे चिन्ह दिले आहे. स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. ज्या ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी बॅट हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!