Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्याशी प्रियांका गांधी यांचे “गुफतगू “

Spread the love

उत्तर भारतात मायावतींच्या बसपाशी तडजोड होत नसल्याने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज मेरठच्या रुग्णालयात जाऊन भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया होते. आता चंद्रशेखर आझाद थेट काँग्रेसमध्ये सहभागी होतात कि त्यांना पाठिंबा जाहीर करतात याकडे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपली लढाई असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले होते.

चंद्रशेखर आझाद यांनी एक व्हिडीओ जरी करून त्यात त्यांनी म्हटले आहे कि , आपण नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे . त्यासाठी आपण योग्य उमेदवार शोधू किंवा न मिळाल्यास आपण स्वतः लढू . आम्हाला देवबंद येथे रॅलीची परवानगी असतानाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमची पदयात्रा निघू दिली नाही . येत्या १५ मार्च रोजी आपण दिल्लीत बहुजन हुंकार रॅलीकाढणार असून या रॅलीत बहुसंख्य लोकांचा सहभाग असेल. कोणी कितीही या रॅलीला रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही. लोकसभा निवडणुकीत आपण मायावतींना समर्थन देणार असून अखिलेशने आरक्षणातील पददोन्नतीवर आपली भूमिका अद्याप जाहीर न केल्यामुळे आम्ही थांबलो आहोत. मुलायमसिंग यांच्या या संदर्भातील वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे.

भीम आर्मीचे  प्रमुख चंद्रशेखर यांना पोलिसांनी आचारसंहितेच्या कारणावरून देवबंद मध्ये अटक केली होती त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेरठ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चंद्रशेखर यांची भेट घेतली. मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली याचा अधिक तपशील मिळू शकला नाही. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या नेत्यांना भेटून त्यांना सोबत घेण्याची इच्छा काँग्रेसकडून घेतली जात आहे. याच भूमिकेतून काँग्रेसने गुजरात मधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना आपल्याप क्षात घेतले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!