गांधी -पटेलांच्या भूमीतून आज काँग्रेस करणार प्रचाराचा शुभारंभ

Advertisements
Advertisements
Spread the love

सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठनेत्यांची उपस्थिती

गांधी -पटेलांच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असून राजकारणात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी प्रथमच यावेळी जाहीर भाषण करणार असल्याचे सांगण्यात  आहे .  अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर एक प्रार्थना सभाही आयोजित केली गेली आहे. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या जन्मभूमितून देशाला एक संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून दिला जाणार आहे. तसेच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची माहितीही एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात येणार आहे.गुजरातच्या भावनगरमध्ये १९६१ला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यानंतर म्हणजे तब्बल ५८ वर्षानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातच्या अहमदाबादमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येते . कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसने गांधीनगर जिल्ह्यातील अडलज येथे जाहीर सभाही आयोजित केली आहे. या सभेतून काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार असून ‘जय जवान, जय किसान’चा नारा देणार आहे.  पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या रणनितीला अंतिम स्वरूप देण्याकरता काँग्रेस कार्यकारिणीची अहमदाबादमध्ये उद्या बैठक होत आहे.

Advertisements

आपलं सरकार