Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : निवडणूक लागताच “मोदी सरकार”ला झाली “एनडीए”ची आठवण !!

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचा  बिगुल  वाजल्यानंतर जनतेकडे पुन्हा एकदा “एनडीए” ला पाठिंबा मागितला आहे.  वर्षे “एनडीए”तील  कुठल्याही मित्र पक्षाची आठवण न झालेल्या मोदी सरकारला आता पुन्हा एकदा “एनडीए”ची आवर्जून आठवण झाली आहे . पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात ट्वीट करत पुन्हा एकदा “एनडीए”ला निवडून देण्याचे जनतेला आवाहन तर केलेच पणआपल्या अखेरच्या ट्विट मध्येही गेली ७० वर्षे सरकारात असलेल्या विरोधकांनी काहीच न केल्याची टीकाही केली . आपल्या  ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “सबका साथ, सबका विकास या मुल्यांतर्गत काम करणाऱ्या “एनडीए”ला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. गेल्या ७० वर्षांपासून देशवासियांचा ज्या गरजा  पूर्ण केल्या नव्हत्या, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांपासून कामे करतोय. आता वेळ आली आहे, या देशाला शक्तीशाली, समृद्ध आणि सुरक्षित करण्याची गरज आहे.” नरेंद्र मोदींनी ट्वीट करताना फिर एक बार मोदी सरकार (#PhirEkBaarModiSarkar)असा हॅशटॅग वापरला आहे. मोदींनी अजून एक ट्वीट करुन एनडीए सरकारने काय कामं केली, त्याबाबत माहिती दिली आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ” ५० कोटी भारतीयांना चांगले आरोग्य दिले. असंघटित क्षेत्रातील ४२  कोटी लोकांना ओल्ड एज पेन्शनची सुविधा दिली. किसान सहाय्यता निधीअंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!