मोदींना इंदिराजींसारखे व्हायला अनेक जन्म लागतील : जावेद अख्तर

‘मुंबई कलेक्टिव्ह’ या फोरमच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना “मोदी सरकारने काही चांगले काम केले आहे का? असा प्रश्न विचारला असता , ते म्हणाले , खरं सांगायचं झालं तर याचं उत्तर मोदी ही देऊ नाही शकत. मोदीजींची छाती ५६ इंच असल्याचं बोललं जातंय. पण या देशाला इंदिरा गांधींचं जे नेतृत्व लाभलं त्याला तोड नाही. मोदीजी आपण इंदिरा गांधी यांची बरोबरी करू शकत नाही. तुम्हाला अनेक जन्म लागतील इंदिरा गांधींसारखं व्हायला. प्रत्येक गोष्टीत इंदिरा या सरस आहेत, असं म्हणाले. ते पुढे म्हणाले , आरएसएस ही फॅसिस्ट संघटना आहे. गोळवलकर यांचा फोटो सर्व कार्यालयात असतो. भारताचा तिरंगा त्यांना अमान्य आहे. त्यांना राज्यघटना मान्य नाही. यांची बौद्धिक क्षमता खालच्या दर्जाची आहे. लालकृष्ण अडवाणी हे भारत छोडो आंदोलनात सहभागी होण्याऐवजी आरएसएसमध्ये गेले, अशी टीकाही अख्तर यांनी केली. देशाच्या सैन्यात वेगवेगळे प्रांताचे रेजिमेंट्स आहेत. फक्त गुजरात रेजिमेंट नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात रेजिमेंट बनवून सुरत, अहमदाबादमधून लोकांना गुजरात रेजिमेंटमध्ये भरती करावं, असे आव्हानही गीतकार जावेद अख्तर यांनी दिले .