Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोहालीतील चौथ्या वन-डे सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

Spread the love

देश लोकसभा निवडणुकीच्या घोषणेत मग्न असताना ऑस्ट्रेलियाने चौथ्या वन-डे सामन्यात ४ गडी राखून भारताचा पराभव केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधल्याने मालिकेतील आव्हान कायम ठेवलं आहे. शिखर धवनची शकती खेळी व्यर्थ ठरली. १९९७ नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारताचा मोहालीतील मैदानावर पराभव केला  आहे. भारताच्या शिखर धवनने १४३ धावांची दमदार खेळी केली. यासह रोहित शर्माच्या ९५ धावांमुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३५९ धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ६ गडी गमवत पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने ९१ धावा केल्या. तर पिटर हॅण्डस्कॉम्ब याने ११७ धावांची शतकी खेळी केली. यासह ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीचा खेळाडू अॅश्टन टर्नरने नाबाद ८४ धावा करत सामन्यात विजय मिळवून दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!