Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवारांची माढातून माघार म्हणजे युतीचा मोठा विजय वाटतो मुख्यमंत्र्यांना …

Spread the love

शरद पवार यांनी माढातून माघार घेणं हा युतीचा मोठा विजय असल्याची  प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढतो आहे. मोदीजी एकदा म्हटले होते की बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो त्याचमुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे असंही मुख्यमंत्री म्हटले आहेत. देशाचा मूड काय आहे याचा अंदाज शरद पवार यांना आला आहे असंही शरद पवार म्हटले आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले. तसेच आपण लोकसभा लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे बारामतीमधून लढणार आहेत, पार्थ पवार हे मावळमधून लढणार आहेत. एकाच कुटुंबातील तिघांनी लोकसभा निवडणूक लढावी असे वाटत नाही त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला असे पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. इतकंच नाही तर आपण आत्तापर्यंत १४ वेळा निवडणूक लढलो आणि जिंकलो आहे. त्यामुळे कोणत्याही भीतीतून ही माघार घेत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र हा निर्णय त्यांनी जाहीर करताच देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा हा पहिला मोठा विजय झाला आहे असे म्हटले आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!