Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : एक नजर , संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

Spread the love

लोकसभा निवडणूक २०१९ देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये होणार असून निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबत घेण्यात येणार नाही. सर्व टप्प्यातील मतमोजणी ही २३ मे रोजी होईल. २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याची घोषणा केली. देशात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचेही त्यांनी सांगितले. मागील वेळी देशात ९ टप्प्यात मतदान झाले होते. विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनला संपणार आहे.

पहिल्या टप्प्यात २० राज्यांमधील ९१ जागांवर मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यातील ९७ जागांसाठी मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यातील ११५ जागांसाठी मतदान होईल. चौथ्या टप्प्यात ९ राज्यातील ७ जागा, ५ व्या टप्प्यात ७ राज्यातील ५१ जागा, सहाव्या टप्प्यात ७ राज्यातील ५९ जागा आणि ७ व्या आणि अखेरच्या टप्प्यात ८ राज्यातील ५९ जागांसाठी मतदान होईल. दिल्लीत सहाव्या टप्प्यात म्हणजे १२ मे रोजी मतदान होईल. १२ राज्यातील ३४ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही लोकसभेबरोबर मतदान होईल.

प्रत्येक मशीनमध्ये व्हीव्हीपॅटची सुविधा

यंदा सर्व मतदानकेंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनची सुविधा असेल. त्यामुळे मतदाराला त्याने केलेले मत कोणाला गेले आहे ते समजेल. त्याचबरोबर ईव्हीएमलाही अनेक स्तरीय सुरक्षा असेल. प्रत्येक उमेदवाराला फॉर्म २६ भरावे लागेल. देशभरात एकूण १० लाख मतदान केंद्रांवर मतदान होईल. २०१४ मध्ये ही संख्या ९ लाखांच्या आसपास होती. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाणार आहे.

 

निवडणुकांच्या सात टप्प्यांच्या मतदानाच्या तारखा

एकूण जागा : ५४३

मतदार ९० कोटी

१० लाख मतदान केंद्र

विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनपर्यंत

मतमोजणी : २३ मे २०१९

पहिला टप्पा – ११ एप्रिल
दुसरा टप्पा – १८ एप्रिल
तिसरा टप्पा – २३ एप्रिल
चौथा टप्पा – २९ एप्रिल
पाचवा टप्पा – ६ मे
सहावा टप्पा – १२ मे
सातवा टप्पा- १९ मे

महाराष्ट्रातील निवडणूक 

११ एप्रिल – ७
१८ एप्रिल – १०
२३ एप्रिल – १४
२९ एप्रिल – १७

आपलं सरकार

Click to listen highlighted text!