पत्नीची हत्या करून “तो” तिच्या मृतदेहा शेजारी झोपला …

Advertisements
Spread the love

पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाशेजारी रात्रभर झोपणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली येथे ही घटना घडली असून प्रेम सिंह असं या आरोपीचं नाव आहे.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेम सिंह हा त्याची पत्नी बबलीसोबत दिल्लीतील निहाल विहार येथे राहतो. त्याला दारुचं व्यसन होतं. त्यावरून त्याचं आणि बबलीचं वारंवार भांडण होत असे. बुधवारी तो दारू प्यायला बसला होता आणि बबलीने त्याला दारू पिण्यापासून रोखलं होतं. त्यावरून संतापलेल्या प्रेमने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाशेजारी झोपला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्याच्या कृत्याचं भान आल्यानंतर तो तिथून फरार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला राजस्थान इथून अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासात आपणच पत्नीची हत्या केल्याचं त्याने कबूल केलं. त्याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.