Air Strikes : ‘यूपीए’च्या कार्यकाळात १२ एअर स्ट्राइक , पण त्याचे राजकारण केले नाही : खरगे

Advertisements
Advertisements
Spread the love

‘यूपीए’च्या १० वर्षाच्या शासनकाळात १२ एअर स्ट्राइक करण्यात आले होते. परंतु, आम्ही कधी याचे राजकारण केले नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी  केली आहे . केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन एअर स्ट्राइक केल्याचा दावा केल्यानंतर खर्गे यांनी त्यांना उत्तर दिले आहे , ते पुढे म्हणाले कि , शहिदांच्या मृतदेहांचे केंद्र सरकारकडून राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकासाच्या नावावर सांगण्यासारखे काही नाही. एनएसएसओच्या अहवालाच्या माहितीनुसार, ३८ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर २७ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. परंतु, भाजपाने १० कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले?, असा सवाल मल्लिकार्जून खरगे यांनी केला. हावेरीमध्ये पक्षाच्या रॅलीला संबोधित केल्यानंतर हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सोमवारी काँग्रेस पार्टीची स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार असून यावेळी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली.

Advertisements

आपलं सरकार