Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अखेर राधाकृष्ण विखे पूत्र सुजय खासदारकी साठी भाजपच्या आश्रयाला

Spread the love

अखेर  “हेलिकॉप्टर वार्ता” आणि मात्रा यशस्वी ठरल्याने काॅंग्रेसचेज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील येत्या 12 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भाजप प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

अहमदनगरची जागा काँग्रेसला सुटण्याची दिसत चिन्हे नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुजय विखे पाटील हे 12 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12 वाजता भाजप प्रवेश करणार आहेत. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले, तरी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडणार नाहीत. सुजयने ‘माझा’शी बोलताना ‘मी स्वतंत्र व्यक्ती आहे, मी वेगळा निर्णय घेऊ शकतो’ असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसकडून नगरची जागा न मिळाल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी केल्याचं म्हटलं जातं.
राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी बोलताना सुजय आपले निर्णय घेण्यास मोकळे असल्याचं सांगत संकेत दिले होते.

सुजय यांना नगरमधून रिंगणात उतरायचं असल्यास त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. मात्र सुजय यांना राष्ट्रवादीत घेऊन तिकीट देण्याऐवजी काँग्रेसला नगरची जागा सोडावी असा काँग्रेसचा आग्रह होता.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच नगरच्या प्रश्नात लक्ष घालणार असल्याची माहिती मिळाली होती. राजधानी दिल्लीत सोमवारी होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी दक्षिण नगरच्या जागेबाबत मध्यस्थी करणार असल्याची माहिती होती. औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांवरुन अजूनही आघाडीमध्ये अंतिम निर्णय झालेला नाही.
सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु असतानाच काल त्यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांसोबत हेलिकॉप्टरने एकत्र प्रवास केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!