Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता

Spread the love

बहुतांश क्षेत्रांत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कर्मचाऱ्यांचा पगार घसघशीत वाढेल, अशी शक्यता एओएन (AON) सॅलरी इनक्रीजच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आली  आहे. २०१९ मध्ये ९.७ टक्के पगारवाढ होईल. गेल्या वर्षी ९.५ टक्के इतकी पगारवाढ झाली होती, असे  सर्व्हेत म्हटले  आहे. सर्व्हेनुसार, उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घसघशीत पगारवाढ होईल. सर्वोकृष्ट काम आणि वेगवेगळी कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ सरासरी काम करणाऱ्यांपेक्षा २.५३ पट अधिक होईल. पगारवाढ करताना डेटा अॅनालिटिक, डिजिटल, क्लाउड कम्प्युटिंग, एआय आणि मशीन लर्निंग, सायबर सेक्युरिटी आदी कौशल्ये विचारात घेतली जातील. तसंच कंझ्युमर इंटरनेट, प्रोफेशनल सर्व्हिसेस, वित्तीय संस्था, हाय टेक आणि आयटी आदी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळेल, असे  सर्व्हेत म्हटले  आहे. देशभरात हा सर्व्हे करण्यात आला. २० उद्योगांतील १००० कंपन्यांमधून माहिती घेण्यात आली. २०१९मधील लोकसभा निवडणुकाही चांगल्या पगारवाढीचं एक कारण असेल, असे  मानले  जाते . ‘निवडणुकांमुळे जून-जुलैमध्ये मूल्यांकन प्रक्रिया राबवणाऱ्या कंपन्यांच्या पगारवाढीच्या बजेटवर परिणाम दिसून येईल. गेल्या दशकभरात आशियात केवळ भारतातच सर्वाधिक पगारवाढ दिली जातेय आणि पुढील काळातही पगारवाढ दिली जाईल अशी अपेक्षा आहे, ‘ असे  एओएनचे अधिकारी आनंदोरुप घोष यांनी सांगितले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!