Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला ठोक ठोक ठोकले !!

Spread the love

राज ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला ठोक ठोक ठोकले !! याचा प्रत्यय आज राज ठाकरे यांच्या सभेत आला . मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. पण जो निर्णय घ्यायचा आहे तो योग्य वेळी घेईन. लोकसभा निवडणूक जागांबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी सांगितलं. मनसेच्या आजच्या १३व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिन सोहळ्यात मनसैनिकांचं कौतुक केलं. पक्षानं अनेक चढ-उतार पाहिले. पण कार्यकर्त्यांनी मला चांगली साथ दिली, असं ते म्हणाले. राज यांनी लोकसभा निवडणुकीबाबत सांगताना, भाजपवरही निशाणा साधला. मनसे लोकसभेच्या किती जागा लढवणार? राज यांनी दोन जागा मागितल्या अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण लोकसभेबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करू, असं राज यांनी सांगितलं.
पुलवामा हल्ल्यानंतर मी जे वक्तव्य केलं, त्यावर भाजपमध्ये फुलबाजा फुटत होता. मोदींच्या आयटी सेलमधील लावारीस मुलं वाटेल ते पसरवत होती. पण मी ट्रोलला भीक घालत नाही,असं त्यांनी ठणकावून सांगितलं. रोज काही तरी नवीन घडावं ही मोदी सरकारची इच्छा असते, असंही ते म्हणाले. यावेळी राज यांनी मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रभक्त कोण ते नरेंद्र मोदी आणि भाजप ठरवणार का? तुम्हाला ते ठरवण्याचा अधिकार कुणी दिला? मोदी राष्ट्रभक्त ना? मग नवाझ शरीफला त्याच्या वाढदिवशी केक भरवायला का गेले, असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत कोण? जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता तर हवेतल्या हवेत विमान फिरवून नवाज शरीफ यांना भेटायला, त्यांच्या वाढदिवशी त्यांना केक भरवायला का गेलात असाही प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. मनसेच्या तेराव्या वर्धापन दिनी ते बोलत होते. अजित डोवाल यांच्या मुलाची कंपनी आहे, त्यात दोन पार्टनर आहेत. एक अरब आहे दुसरा पाकिस्तानी आहे असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. हे भाजपाला चालतं इतर कोणी असता तर त्याला राष्ट्रद्रोही किंवा देशद्रोही ठरवले असते. राष्ट्रभक्ती आपल्याला शिकवणारे नरेंद्र मोदी कोण आहेत? आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओविसीयांचीही खिल्ली उडवली. ते नेमके कुणाचे आहेत हेच समजत नाही, समजेलच काही दिवसात असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!