Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

९२ वर्षांचे “पीएचडी ” दानवेंच्या विरोधाचे शड्डू ठोकण्याच्या तयारीत …

Spread the love

पुंडलीक हरी दानवे म्हणाले…

‘बिभीषणाला रावणाची लाज वाटायची तशी मला रावसाहेब दानवेंची लाज वाटते’

मी ९२ वर्षाचा असलो तरीही हरकत नाही शरद पवारांनी रावसाहेब दानवेंविरोधात लढण्यास सांगितले तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर राम विरूद्ध रावणाची लढाई होईल असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांचे राजकीय गुरु पुंडलिक हरी दानवे यांनी केले आहे. इतकेच नाही तर “बिभीषणाला जशी रावणाची लाज वाटायची तशीच मला रावसाहेब दानवेंची लाज वाटते” असेही त्यांनी म्हटले आहे.  रावसाहेब दानवे यांनी संसद भवनाला किती खांब आहेत हे तरी माहित आहे का? या प्रश्नाचे उत्तर जरी त्यांनी बरोबर दिले तरीही मी त्यांच्या विरोधात राजकारण करणे सोडून देईन असेही आव्हान पुंडलिक दानवे यांनी दिले आहे. पुंडलिक हरी दानवे हे रावसाहेब दानवे यांचे राजकीय गुरु आहेत. मात्र आता पुंडलिक दानवे यांनीच रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटले आहेत. पुंडलिक हरी दानवे यांनीच रावसाहेब दानवेंना राजकारणात आणले, तसेच अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी रावसाहेब दानवेंना मदतही केली. मात्र रावसाहेब दानवे हे सारे काही विसरले, त्यांना आपण केलेलेल्या मदतीची जाणीव राहिली नाही अशी खंतही पुंडलिक दानवेंनी बोलून दाखवली. पुंडलिक हरी दानवे जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. १९७७ मध्ये ते जनता दलातर्फे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते भाजपाच्या तिकिटावर चारवेळा निवडणूक लढले पण एकदाच जिंकले. पुंडलिकराव दानवे यांना तिकिट मिळण्याची शक्यता नाही, मात्र  रावसाहेब दानवे यांच्या विजयाची  वाट ते अडवू शकतात हे मात्र खरे . कारण पुंडलिक दानवे यांना मानणारा जुना मतदार आहे, त्यांच्या मतांचा परिणाम हा रावसाहेब दानवेंना मिळणाऱ्या मतांवर होण्याची शक्यता आहे. काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पुंडलिक दानवे यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात उभं राहण्याची तयारी दर्शवून खळबळ उडवून दिली आहे. आधीच  अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे  रावसाहेब दानवे पेचात सापडले होते आता गुरूंनीही त्यांच्या विरोधात शड्डू ठोकल्यामुळे दानवे यांच्यासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!