नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करून शिक्षिकेचा विनयभंग

Advertisements
Spread the love

नग्न अवस्थेत व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना  पिंपरीमध्ये घडली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत मोबाइल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४३ वर्षीय शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिका २ री व ३ रीच्या वर्गात बसल्या होत्या. तेव्हा त्यांना एका मोबाईल वरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल आला. त्यामुळे त्यांनी तो कॉलला उत्तर दिलं. तेव्हा संपूर्ण नग्न अवस्थेत असलेला एक व्यक्ती उभा असलेला त्यांना दिसला. तशा अवस्थेतच त्याने कॉल करून पीडित शिक्षिकेचा विनयभंग केला. सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू  असल्याचे सांगण्यात येत आहे.