Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप-सेनेकडून मराठा समाजाची फसवणूक , म्हणून मतदान नाही : मराठा क्रांती मोर्चा

Spread the love

राठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. मराठा बांधवांचा कणा मोडण्यासाठी १३ हजार ७०० गुन्हे दाखल झाले आहेत. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी जाळपोळ केलेली नाही. आमच्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत. त्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या निवडणुकांध्ये मतदानावर बहिष्कार घालणार अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली आहे. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. या भाजपा आणि सेनेला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी म्हटले आहे. भाजपा शिवसेना ला मतदान करू नका यासाठी मराठा समाज ५ कोटी पत्रके वाटणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

यावेळी उद्धव ठाकरेंवरही मराठा समाजाने टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा समाजाशी उद्धटपणे वागणाऱ्या उद्धव ठाकरेंना आम्ही मराठा समाज मोठा की शिवसेना मोठी हे दाखवून देऊ. खेड्यापाड्यांमध्ये मराठ्यांच्या जीवावर सेना उभी राहिली आहे हे त्यांनी विसरू नये असंही मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी म्हटलं आहे.मराठा समाजाच्या विरोधात जो जो उभा राहील अशा सर्व पक्षांना पडण्याचे काम येत्या काळात मराठा समाज करेल

एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र द्यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात; अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी राज्यव्यापी बैठकीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

भाजपा-शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याने आता पुढे काय, याबाबत चर्चा करून रणनीती ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राज्यव्यापी बैठक घेतली. या वेळी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या समन्वयकांनी सूचना मांडल्या. मोर्चा समन्वयकांनी सांगितले की, मागील अडीच वर्षांत मराठा समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढले. मात्र, सरकारने २१ पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाबाबत तर घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांविरोधात प्रचार करावा लागेल. विद्यमान सरकार विरोधात ५ लाख  फलक पूर्ण राज्यभर लावणार तसेच घरोघरी पत्रके वाटून भाजप शिवसेनेला मतदान करू नका याबाबाबत जनजागृती करणार मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!