Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप -सेनेच्या वादात अडकलेल्या जागांवर आज मुख्यमंत्री -उद्धव यांच्यात चर्चा

Spread the love

भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती करून लोकसभेच्या २३ शिवसेनेकडे आणि २५ जागा भाजपकडे असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी काही जागांवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात चिंता वाढत आहे . या चिंतेचे निराकरण करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

ज्या  जागांची भाजपाला डोकेदुखी झाली आहे त्यात जालना येथील जागेचा खासदार रावसाहेब दानवेआणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा विषय आहे. दानवे आणि खोतकर या दोघांमध्ये  चालू आहे . उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला होता तेव्हापासूनच खोतकर यांनी दानवेंविरोधात दंड थोपटले होते. मात्र युती झाल्यावरही खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या वतीने जालना येथे जाऊन खोतकरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही खोतकरांनी आपले नेते उद्धव ठाकरे आहेत ते सांगतील ती आपल्यासाठी पूर्व दिशा असेल असे म्हटल्याने या मध्यस्तीचा कुठलाही परिणाम अर्जुन खोतकर यांच्यावर झाला नाही असेच म्हणावे लागेल . भाजपसाठी भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष असलेल्या दानवेंनी जागा अर्थातच अतिशय प्रतिष्ठेची आहे त्यामुळे जालन्याच्या जागेचा पेच कसा सोडवायचा याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे. आज  होणाऱ्या बैठकीत या जागेवर मुख्यत्वे चर्चा होऊ शकते असाही अंदाज व्यक्त होतो आहे.

जालन्याच्या या डोकेदुखीसोबतच इतर जागांबाबतही शिवसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. भिवंडीची जागा शिवसेनेला हवी असल्याचीही चर्चा आहे.  भाजपा जालन्याच्या बदल्यात भिवंडीची जागा सोडणार का? यावरही गुरुवारी चर्चेची शक्यता आहे. दुसरीकडे रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले हे ईशान्य मुंबईतून लढण्यास उत्सूक  आहेत तर  किरिट सोमय्या शिवसेनेलाही नकोसे आहेत त्यामुळे या जागेवरून आठवलेंनी लढण्यास शिवसेनेचा काहीही आक्षेप नाही. तर शिवसेनेकडे असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपाला हवा आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. मात्र हा मतदारसंघ भाजपाला त्यांच्या उमेदवारासाठी हवा आहे. आता हा मतदारसंघ शिवसेना भाजपाला देणार का? जागांच्या वादावर उद्या काय तोडगा निघतो याकडे दोन्हीही पक्षकार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!