Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एकनजर : महत्वाच्या बातम्या….

Spread the love

1. वंचित बहुजन आघाडीकडून बारामती, नांदेड आणि माढ्यासह २२ जागांची मागणी; काँग्रेस-राष्ट्रवादीकडे प्रस्ताव

2. पाकिस्तानकडून एक प्रतिनिधीमंडळ १४ मार्च रोजी नवी दिल्ली दौऱ्यावर येणार; यानंतर भारतातील एक प्रतिनिधीमंडळ २८ मार्च रोजी इस्लामाबाद दौऱ्यावर जाणार असल्याचं पाकच्या परराष्ट्राकडून जाहीर

आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती न होण्याचा भाजपलाच फायदाः मेहबुबा मुफ्ती यांचा दावा

अर्जुन खोतकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती

दुसरी वन-डेः रोमांचकारी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी विजय

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जी-२० देशांच्या राजकीय नेत्यांची उद्या घेणार भेट

कोलकाताः जवानांच्या रक्ताने आपण निडवणुका जिंकू शकत नाही. जवान देशासाठी रक्त सांडतो. शहिदांवर केलेल्या राजकारणाचा मी निषेध करतेः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं मत

पुणेः भीमाशंकरच्या नागफणी पॉइंडवरून पडलेल्या मायलेकींचे मृतदेह सापडले; ‘एनडीआरएफ’ टीमकडून शोधकार्य

दिल्लीः पाकिस्तानकडून वापरल्या गेलेल्या एफ-१६ चे पुरावे भारताने अमेरिकेला सोपवले

राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

सोलापूर विद्यापीठाला देणार अहिल्यादेवी होळकरांचं नाव; राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची शिवसेनेशी युती झाली. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेससोबत आहे. अशा परिस्थितीत आम्ही मत मागण्यासाठी जायचे कसे ? वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन सेना – काँग्रेस युती तोडावी; जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यांची मागणी

औरंगाबाद: सुरेश पाटील आत्महत्या प्रकरणात आरोपी सदाशिव गायके व नानासाहेब गायकवाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकाल राखीव

काँग्रेसला दहशतवाद्यांच्या मृत्यूचा आकडा हवा असल्यास पाकिस्तानला विचारा, नाहीतर स्वतः जाऊन शवांची मोजणी कराः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची टीका

मध्य प्रदेशः भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केलं. मात्र, त्याचा घाव देशातील काही लोकांच्या मनावर झाला – पंतप्रधान मोदी

काँग्रेस व्यतिरिक्त सर्व विरोधक भाजपला पराभूत करण्याची इच्छा ठेवून आहेत. काँग्रेस मुद्दामहून जनमताच्या विरोधात जात आहेः आम आदमी पक्षाची टीका

औरंगाबाद : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदार संघातून एमआयएम जाहीर करणार उमेदवाराचे नाव; वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचा संयुक्त उमेदवार असणार

सैनिकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे – रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

औरंगाबाद : हॉटेल व्यावसायिकाच्या बँकेसमोर उभा गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी एक लाखाची रोकड पळवली.

औरंगाबाद: दौलताबादरोडवर ट्रक व कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

आपलं सरकार

Click to listen highlighted text!