Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जनता नाकारणार या भीतीने मोदी जवानांच्या शौर्याचे राजकारण करताहेत : शरद पवार

Spread the love

डिसेंबर महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्ये भाजपाने गमावली. यानंतर जनता आपल्याला नाकारणार याची कुठेतरी या सरकारला खात्री पटू लागली. त्यानंतर आता जवानांच्या शौर्याचंही राजकारण केलं जातं आहे असंही शरद पवार म्हटले. देशाचा मूड बदलला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजलं त्यामुळे त्यांनी हवाई हल्ल्याचं आणि जवानांनी दाखवलेल्या शौर्याचंही राजकारण करण्यास सुरुवात केली अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

देशाच्या जवानांनी भारताची प्रतिष्ठा जगात वाढवली. मात्र दुर्दैवाची बाब ही आहे की मोदी सरकार या सगळ्याचं राजकारण करत आहे. शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला आणि आता छाती कोण फुगवून दाखवत आहे? असाही टोला शरद पवार यांनी लगावला. सत्तेचा गैरवापर करूनच सत्ता राखायची हे या सरकारचं धोरण आहे. मध्यप्रदेशात जेव्हा एके ठिकाणी इव्हीएम मशीन तपासण्यात आली त्यावेळी कोणतंही बटण दाबल्यास भाजपालाच मत जात होतं.३ राज्यांमध्ये जेव्हा पराभव झाला तेव्हा मोदींना देशाचा मूड काय ते समजलं. त्यामुळेच त्यांनी आता लष्करी कारवाईचंही राजकारण करण्यास सुरुवात केली आहे अशी टीका शरद पवार यांनी केली.१४ फेब्रुवारीला जेव्हा पुलवामात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर बारा दिवसांनी पाकिस्तानवर हवाई हल्ला करून देशाने त्यांना उत्तर दिलं. मात्र या सगळ्याचं राजकारण होतं आहे ही बाब दुर्दैवी आहे. विद्यमान सरकार जवानांच्या शौर्याचंही राजकारण करण्यात धन्यता मानत आहे असाही टोला शरद पवार यांनी लगावला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!