Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाणबुडीबाबतचा पाकिस्तानचा खोटा दावा भारताने फेटाळला

Spread the love

भारताची पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी सीमेत आली होती जी आम्ही परतवून लावली असे पाकिस्तानने म्हटले आहे. मात्र पाकिस्तानचा हा दावा सपशेल खोटा आहे. जो व्हिडिओ पाकिस्तानने जारी केला आहे तो २०१६ चा आहे असं भारताने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानने केलेला दावा पोकळ आहे हे स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानने जो दावा केला तो हास्यास्पद आहे कारण जे व्हिडिओ फुटेज दाखवण्यात आलं ते २०१६ चं आहे असंही भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले  आहे.

पाकिस्तानने पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते कि , भारतीय नौदलाची एक पाणबुडी आमच्या सागरी हद्दीत शिरली होती जी परतवून लावण्यात आम्ही यश मिळवले  आहे . एवढंच नाही तर यासंबंधीचे  एक फुटेजही पाकिस्तानने प्रसिद्ध केले होते . ज्यानंतर भारताने पाकिस्तानाचा हा दावा सपशेल खोटा असल्याचं म्हटलं आहे. इतकेच नाही तर जो व्हिडिओ पाकिस्तानने प्रसारित केला तो २०१६ चा असल्याचंही भारताने सांगितले  आहे. त्यांनी फक्त तारीख आणि शिक्का बदलला अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या सूत्रांना देण्यात आली.

आम्ही भारताची पाणबुडी परतवून लावली असा दावा पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यामुळे यासंबंधीचे वृत्त सगळीकडेच झळकले. मात्र हे वृत्त आल्यानंतर काही वेळातच भारताने यासंबंधीचे स्पष्टीकरण देऊन असे काहीही झाले नसल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये जो प्रत्यक्ष फोटो आहे असे दाखवण्यात आले आहे तो ४ मार्च २०१९ ला रात्री ८.३० च्या सुमारास तयार करण्यात आला आहे असे भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!