Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Narendra Modi : राहुल गांधी यांनी १३०० लोकांना रोजगार दिला नाही : नरेंद्र मोदी

Spread the love

राहुल गांधींनी १५०० जणांना कारखान्यात रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली. त्यांनी केवळ २०० लोकांना रोजगार दिला. तरुणांचा विश्वासघात करणारे जगात रोजगारावर भाषणं देत फिरत आहेत, अशी टीका मोदींनी केली. ‘या ठिकाणी ८-९ वर्षांपूर्वीच काम सुरू व्हायला हवं होतं. कोरबातील या कारखान्याची सुरुवात अत्याधुनिक रायफल्सच्या निर्मितीसाठीच झाली होती. मात्र या कारखान्याचा पूर्ण वापर करण्यात आला नाही. भूमिपूजन झाल्यानंतरची ३ वर्षे या ठिकाणी कोणत्या रायफल्स तयार करायच्या या चर्चेमध्येच गेली. साधी इमारतदेखील उभारली गेली नाही. २०१०मध्ये काम सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र २०१३ पर्यंत काम सुरूच झालं नाही. इमारत तयार झाल्यावर बराच काळ रायफल्सची निर्मितीच झाली नाही,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसच्या संथ कारभारावर टीका केली. अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती न झाल्यानं आपल्या वीर जवानांवर अन्याय झाला की नाही, असा सवाल मोदींनी उपस्थित असलेल्या जनतेला विचारला. ‘इथल्या संसाधनांवर अन्याय झाला की नाही? रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांवर अन्याय झाला की नाही?,’ असे प्रश्न मोदींनी अमेठीतील जनतेला विचारले. ‘2014 मध्ये आम्ही सबका साथ-सबका विकासची घोषणा दिली होती. अमेठी याचं उदाहरण आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केलं, ते आमचे आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही, ते देखील आमचेच. ज्या मतदारसंघात विजयी झालो, तो आमचा आणि पराभूत झालो, तो देखील आमचाच,’ असेही मोदी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!