It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

1. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे पायलट अभिनंदन उद्या वाघा सीमेवरून मायदेशात दाखल होणार, वेळ अद्याप स्पष्ट नाही

2. विंग कमांडर अभिनंदन उद्या मायदेशात येणार. पाकिस्तानच्या भूमिकेचं स्वागतः हवाई दल

Advertisements


Advertisements

3. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहील तोपर्यंत दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करत राहणार, लष्कराने ठणकावले.

4. स्वयंपाकाच्या अनुदानित गॅसच्या सिलिंडरच्या दरात दोन रुपये आठ पैसे, तर विनाअनुदानितस्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात ४२ रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ही माहिती दिली.

5. कोरेगाव-भीमा प्रकरण: सुधा भारद्वाज यांच्या भवितव्याचा फैसला ११ मार्चला, मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला निर्णय. भारद्वाज यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण, राज्य सरकारचा जोरदार विरोध

6. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. शहीद जवानांबद्दल संवेदना व्यक्त करत दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत असल्याचं पुतीन यांचं वक्तव्य

7. व्होडाफोन-आयडियामध्ये २५ हजार कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीला मंजुरीः अरुण जेटली

8. मोबाइल नंबर बँक खाती आणि आधारला जोडणं ऐच्छीक करणार, यासंदर्भात अध्यादेश काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

9. पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या छळाचा व्हिडिओ हटवा, भारत सरकारची युट्यूबला नोटीस. यासंबंधी युट्यूबने ११ व्हिडिओ हटवले, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती

10. जम्मू-काश्मीर आरक्षण कायद्यातील सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, जम्मू-काश्मीरमध्येही आर्थिकदृष्ट्या मागासांना १० टक्के आरक्षण लागू

11. हिमाचल प्रदेशः किन्नौर येथे हिमस्खलनात दबलेल्या लष्कराच्या ५ जवानांना वाचवण्यासाठी गेल्या ९ दिवसांपासून बचावकार्य सुरू

12. भारत-पाकमधील तणावामुळे ३ मार्चपासून पुढील सूचना येईपर्यंत समझोता एक्स्प्रेसची वाहतूक रद्द, रेल्वेची माहिती

13. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावीः जर्मनी

14. पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचे पुरावे आमच्याकडे आहेत. पुरावे कधी दाखवायचे हे सरकार ठरवणार, हवाई दलाची माहिती

15. जालनाः सुरेश दिनकर राऊत (वय २३ ) या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या, दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते

16. अहमदनगर: कर्जबाजारीपणाला कंटाळून कर्जत तालुक्यातील रजपुतवाडी येथील शेतकरी लक्ष्मणसिंग परदेशी यांची गळफास घेऊन आत्महत्या

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकारने या राज्यातील जमात-ए-इस्लामी या संघटनेवर बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेबाबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर बंदी आदेशाची अधिसूचना गुरुवारी रात्री जारी करण्यात आला. ‘जमात’चा दहशतवादी संघटनांशी संबंध असून, देशात अनेक ठिकाणी विघातक कारवाया घडवण्यात या संघटनेचा हात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये मोहीम राबवून ‘जमात’च्या अनेक म्होरक्यांना आणि हस्तकांना अटक केली आहे.